MUMBAI : कर्नाक रोड ओव्हर ब्रिजचे शीळा (दगड)- हेरिटेज गल्लीमध्ये जतन केले

0
256

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि मशीद रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक रोड ओव्हर ब्रिज नुकताच पाडला. कर्नाक स्टील स्ट्रक्चर ब्रिज १८६८ मध्ये बांधण्यात आला. पुलाची लांबी ५० मीटर आणि रुंदी १८.८ मीटर होती आणि त्याला ७ स्पॅन होते. पुलाचे अंदाजे वजन ४५० टन होते.

पुलाच्या दोन्ही टोकांना पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष लिहिलेले बेसाल्ट दगड होते. शिलालेख असलेले असे ६ शीळा (दगड) होते. १८५८ च्या शिलालेखांमुळे पुलाचे बांधकाम त्या वर्षी सुरू झाले असावे. मध्य रेल्वेने या ६ शीळा (दगड) पी. डी’मेलो रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्व प्रवेश) येथील हेरिटेज गल्ली येथे जतन केले आहेत.