spot_img

Mumbai : संजय राऊत यांची जामिनावर सुटका

Mumbai: Sanjay Raut released on bail

सुधाकर कश्यप
मुंबई :(Mumbai)
शिवसेना नेते संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने(Mumbai Sessions Court) जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, हे पैसे भारताच त्यांची सुटका झाली. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांना ही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सेशन कोर्टात सुनावणी झाली. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांची पत्नी माधवी राऊत या दोघांमध्ये झालेल्या व्यवहारातील 1 कोटी 6 लाख या पैशांचा हिशोब लागत नाही, याबाबत अद्याप तपास सुरू आहे, या मुद्यावर आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला होता. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत हे पडद्यामागून सर्व सूत्र हाताळल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले होते.

ईडीने(ED) नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, ४ प्रकारात जामीन अर्जाची विभागणी करण्यात आली आहे. आरोपात या संपूर्ण गैरव्यवहारात पडद्यामागून संजय राऊत यांचा हात असल्याचे निदर्शनास तपासादरम्यान आले आहे. म्हाडा आणि इतर प्रशासकीय बैठकांसाठी संजय राऊत यांनी त्यांच्या राजकीय हेतूने मदत केल्याचेही तपासात समोर आले होते.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सुरूवातीला 13 एकरात होणार होता. मात्र, कालांतराने 47 एकरात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले. या प्रकल्पात 672 रहिवाशी होते. तर, या प्रकल्पामध्ये 18 इमारतींपैकी 16 इमारतींचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, वस्तुस्थिती पडताळली असता अद्याप एकही इमारत बांधण्यात आलेली नाही.

पत्राचाळ प्रकल्प ज्या ठिकाणी बनत आहे ती जागा म्हाडाची आहे. म्हाडाने गुरू आशिषला हे काम दिले होते. मात्र, काम देताना रहिवाशांच्या पुर्नवसन त्याच जागेत करण्यात यावे, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. प्रकल्प सुरू केल्यानंतर पहिल्यांदा तेथील स्थानिक रहिवाशांचे पुर्नवसन करावे, असे ठरले होते. मात्र, दुर्दैवाने ते अजून झालेले नाही. स्थानिक रहिवासी अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहेत आणि हे सर्व जणांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. नंतर स्वत:च्या फायद्यासाठी गुरू आशिषने खासगी विकासकांना प्रकल्प विकला आहे. प्रकल्प विकला असताना मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या पैशाचा गैरवापर केल्याचा युक्तिवाद ईडीच्यावतीने वकील अनिल सिंह(Anil Singh) यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन मिळणार नाही असे वाटत होते. मात्र, विशेष PMLA कोर्टाचे न्यायमूर्ती पी. डी. देशपांडे(P. D. Deshpande) यांनी जामीन दिला. दोन हजार रुपयांच्या रोख रकमेचा जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी तात्काळ दोन लाख रुपये एवढी रक्कम भरली. यानंतर कोर्टाच्या आवारातून संजय राऊत यांची सुटका झाली. त्याच प्रवीण राऊत यांना योग्य जामीनदार देण्याचे आदेश झालेत, त्यामुळे दोन लाख रुपयांचा जामीनदार दिल्यावर प्रवीण राऊत यांची सुटका होणार आहे. विशेष PMLA कोर्टाच्या या निकालास विरोध करीत आम्हाला या निकालाविरोधात कोर्टात जायचे असल्याने स्थगिती द्यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने करण्यात आली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावली, त्यामुळे 100 दिवसाच्या जेलनंतर संजय राऊत हे बाहेर आलेत.

Explore our articles