Mumbai : अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोर मोर्चा

0
158
Mumbai: NCP march in front of Ministry against Abdul Sattar

महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांत झटापट
Indiagroundreport वार्ताहर
Mumbai : (Mumbai)
अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानाचा निषेध करीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी(NCP women activists) मंत्रालयासमोर मोर्चा काढला. अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचा(Abdul Sattar) राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच, अब्दुल सत्तारांसह शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाल्याचे बघायला मिळाले. या मोर्चात राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

भाजपच्या महिला नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Aawhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळतो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, आज आम्ही आंदोलन करीत असताना आम्हालाही पोलिसांनी बाजूला केले, म्हणून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

काही दिवसांपूर्वी संभाजीनगर(Sambhajinagar) येथे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता.