spot_img
HomeUncategorizedMumbai : बाबा रामदेवच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Mumbai : बाबा रामदेवच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

प्रशांत बारसिंग
मुंबई :
(Mumbai) ‘रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, ‘रामदेवबाबा हायहाय’, ‘समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेवबाबाचा निषेध असो’, ‘मुखी रामराम बोला, याला जोड्याने हाणा’, अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने(NCP) बाबा रामदेवच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.

मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई मीडिया समन्वयक दीपक पारडीवाला, उत्तर मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, महिला, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र, सकाळी योग विज्ञान शिबीर झाले, त्यानंतर महिलांसाठी योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी भाष्य करताना म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही हरकत नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात आणि माझ्या नजरेने पाहता काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर