spot_img

Mumbai : नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार

प्रशांत बारसिंग
मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या(Nadhwade Small Irrigation Project) कामास गती देण्यासाठी १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयामुळे वैभववाडी(Vaibhavwadi) तालुक्यातील नाधवडे व सरदारवाडी गावातील सुमारे ५०० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशात असून, या प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ८.२२ दलघमी असा आहे.

Explore our articles