Mumbai : मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामाला लागा : उद्धव ठाकरे

0
147

उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज, बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामा लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे देखील आगामी निवडणुकीकडे(election) लक्ष लागले आहे.

राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष देखील आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज, बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठीची तयारी करा. राज्यात ज्यांची सत्ता(power) आहे ते वॉर्ड पुर्नरचना करणारच. त्यांना ती करू द्या. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया. मुंबई महापालिका आपल्याकडे राहणार, कामाला लागा. तसेच सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा.