spot_img

Mumbai : झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या : पालकमंत्री

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची सूचना

दीपक कैतके
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला(Anganwadi) जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी येथे दिले.

अंधेरी(पूर्व) येथील के ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha) बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी, तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींच्या(buildings) भितींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी उपलब्ध करून द्यावा. रस्ता बांधकामावेळी ज्यांचे घर तोडले जात असेल, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. शासनामार्फत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या तक्रारीवर तातडीने निर्णय घ्यावा. शासकीय सामुग्रीची चोरी होत असलेल्या भागात सीसीटीव्ही(CCTVs) बसवावेत आणि नुकसानग्रस्त भागाची दुरूस्ती करावी, असे निर्देशही यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Explore our articles