Mumbai : बिरसा मुंडा जयंतीदिनी किसान सभा

0
196
Mumbai: Kisan Sabha on Birsa Munda Jayanti

देशभर १ लाख गावांत करणार ध्वजारोहण
दीपक पवार
मुंबई : (Mumbai)
महान आदिवासी शेतकरी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा बिरसा मुंडा(Birsa Munda) यांच्या जयंतीदिनी किसान सभेच्यावतीने देशभर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे. देशभर १ लाख गावांत किसान सभेच्या झेंड्याचे ध्वजारोहण लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आणि परकियांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज जेव्हा पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार(BJP government) आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करीत राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे व आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारून त्यांना जंगलातून बेदखल केले जात आहे. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करणे अटळ झाले आहे, असे किसान सभेचे(Kisan Sabha) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

जयंतीदिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण १५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. १३ ते १६ डिसेंबर २०२२ या काळात त्रिचुर, केरळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या ३५व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार कार्याची ही सुरुवात असेल, असे डॉ.अजित नवले यांनी सांगितले.