spot_img
HomeUncategorizedMumbai : शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप; सरकार लवकरच गडगडणार : महेश...

Mumbai : शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप; सरकार लवकरच गडगडणार : महेश तपासे

Mumbai : Kamakhya Devi's anger on Shinde government; Govt will collapse soon: Mahesh Check

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai)
शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे(Mahesh Tapase) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन गेले आहेत, त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली.

२९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सुप्रीम कोर्टाचा(Supreme Court) निकाल येणार असून, या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे आणि त्यात स्वत: एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे निलंबन झाल्या-झाल्या शिंदे सरकार गडगडणार आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

शिंदे सरकारकडून(Shinde government) बळीराजाला ताकद देण्याचे काम झालेले नाही. शिवाय, तरुणांना रोजगार मिळणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले, तरीसुद्धा तरुणांच्या बाजूची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही, उलट गुजरातला सहकार्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच यंदा कामाख्या देवीचा आशिर्वाद नाही, तर कोपाला सामोरे जावे लागणार आहे, असे महेश तपासे यांनी म्हटले.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर