spot_img

Mumbai : सत्तार वादग्रस्त प्रकरणात आता वडार समाजाची उडी

Mumbai: In the Sattar controversial case, now the Wadar community is jumping

राष्ट्रपतींकडे करणार तक्रार
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवमानकारक वक्तव्य करून समस्त भारतीय महिलांचा अपमान केला आहे, त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यात आंदोलने केली जात आहेत, त्यात आता वडार समाजानेही(Wadar Samaj) उडी घेतली असून, अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्यावतीने आंदोलने करण्यात येणार आहेत. इतकेच नाहीतर याबाबत थेट राष्ट्रपती यांच्याकडे कारवाईसाठी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांचे ते वक्तव्य म्हणजे समस्त महिलांचा अवमान करणारे आहे, त्यामुळे अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शिंदे यांनी वडार समाजाच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीत अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून ठराव संमत करण्यात आला आहे. संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मूर्म यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांचा राज्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी संघटनेची आहे, अन्यथा देशाच्या राष्ट्रपतींकडे साकडे घालणार, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

Explore our articles