
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विधान ताजे असतानाच, आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांची सुद्धा जीभ घसरली आहे. माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविषयी बोलताना रामदास कदमांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
अनिल परब(Anil Parab) यांना उद्धव ठाकरे यांचे दलाल म्हणताना रामदास कदमांनी शिवीगाळही केली. उद्धव ठाकरे यांना असेच दलाल सोबत लागतात, असे रामदास कदम म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार, तसेच माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली.
अनिल परब यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेली दापोली मंडलगड नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) घशात घातली. परब यांनी माझ्या योगेशदादावर अन्याय करून त्यांना बाजूला ठेऊन ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम केले. इतकेच नाही, तर अनिल परब यांनी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोपही रामदास कदम यांनी केला.
आता रामदास कदम यांनी अनिल परब यांना शिवीगाळ केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


