Mumbai : आदित्य ठाकरे जाणार बिहार दौऱ्यावर

0
408

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) बुधवारी(२३ नोव्हेंबर २०२२) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. ते बिहारची राजधानी पटना येथे बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagatsinh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या भेटीला सदिच्छा भेट म्हटले असले तरी या भेटीबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत.