Mumbai : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
330
Mumbai: A case of molestation has been filed against Jitendra Awad

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देण्याचा मन:स्थितीत
प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे. पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे(has tweeted).

‘हर हर महादेव’ सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर, काल कळवा-मुंब्रा नवीन पूल उद्घाटनाच्या(inauguration) कार्यक्रमादरम्यान महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(NCP) संताप व्यक्त करण्यात येत असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून, त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रविवारी कळवा(Kalwa) आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे भाजप नेते आणि भाजप मुंबई विभागीय अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी आव्हाड यांना आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड यांनी आपण निर्दोष असल्याचे कोर्टात सिद्ध करावे, खोटा कांगावा करू नये, अशी टीका केली. तसेच, आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, त्यानतंर होणारी पोटनिवडणूक आम्ही जिंकू, असा दावा देखील आशिष शेलार यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, असे जयंत पाटील(प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड हे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहे. मुब्य्राच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिले आहे. अतिशय चांगल काम ते त्याठिकाणी करीत आहेत. एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते, त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये. जितेंद्र आव्हाड यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे, सध्या राज्यातील राजकारण कुठल्या पातळीला जात आहे, याची चिंता वाटत आहे, असे असे सुप्रिया सुळे(खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी म्हटले आहे.

राज्यात अतिशय लाजीरवाणे आरोप आता व्हायला लागले आहेत. मला सर्वात आधी हे सांगायचं आहे की, ना राष्ट्रवादीबद्दल काही आस्था आहे, ना जितेंद्र आव्हाडांबद्दल काही आस्था आहे. पण जे चुकीचे आहे, ते चुकीचंच आहे. आज संपूर्ण व्हिडीओ मी पाहिला. एकदा नाही, तर मी 10 वेळा पुन्हा-पुन्हा पाहिला. कुठेही विनयभंगासारखी कोणतीही कृती त्यांच्याकडून झालेली नाही. मग विनयभंग, त्यांनी मला अमूक पद्धतीने हात लावला, असे म्हणणं चुकीचे आहे. आव्हाड त्यांच्यावरचा आरोप चुकीचा आहे, मी हे ठामपणे सांगते आहे, अंजली दमानिया(नेत्या, आप) यांनी म्हटले आहे.