Mumbai : बोरीवलीत सापडले 4 दिवसाचे अर्भक

0
205

मुकुंद लांडगे
मुंबई : बोरीवली(Borivali) पश्चिमेकडील गोराई रोड येथील आकाशवाणी बसस्टॉपच्या मागील बाजूस एक ४ दिवसाचे स्त्रीअर्भक सापडले असून, त्याला एमएचबी पोलिसांनी(MHB police) ताब्यात घेऊन त्यास उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अद्याप आरोपीचा शोध घेत आहेत. गेल्या २० नोव्हेंबर रोजी रात्री पोलीस ठाण्यातील अंमलदार देवरांग नाईक यांना मोबाईलवरून कळाले की, एक अर्भक बेवारस अवस्थेत पडलेले आहे. ही मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्या अर्भकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याने कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात(Dr. Babasaheb Ambedkar Hospital) तातडीने दाखल केले. त्याला कोणी सोडून दिले याबाबत अद्याप पोलीस शोध घेत आहेत. मात्र, मातेचा अथवा या बाळाला सोडून देणाऱ्यांचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या बाळाला पोलिसांच्या निर्भया पथकाने(Nirbhaya team) ताब्यात घेतल्यानंतर त्याची देखभाल सुरू आहे. तर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.