spot_img

Thane : 16 नोव्हेंबर रोजी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील एचटी सबस्टेशनमधील तांत्रिक दुरुस्तीसह शहरातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या पाईपच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच, जयभवानीनगर स्मशान घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या पंपिंग स्टेशनची(pumping station) जलवाहिनी व उच्चदाबाचे पॅनल बुधवारी हलविण्यात येणार आहेत. यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ठाणे शहरातील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रूपदेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रीडा मंडळ, किसननगर(Kisannagar) आदी भागात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, ठाणे शहरातील उर्वरित भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा(water supply) होण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी पाण्याची साठवणूक व हाताळणी करून त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

New Delhi : अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्व कप 2026 के लिए आईसीसी ने घोषित किये मैच अधिकारी

नई दिल्ली : (New Delhi) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) (ICC) ने गुरुवार को जिम्बाब्वे और नामीबिया में आयोजित होने वाले आईसीसी अंडर-19...

Explore our articles