spot_img
HomeUncategorizedMumbai : रवीकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन तात्पुरते घेतले मागे

Mumbai : रवीकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन तात्पुरते घेतले मागे

राज्य सरकारला दिला 15 दिवसांचा वेळ

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवीकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन जाहीर केले होते, जे आता त्यांनी तात्पुरते मागे घेतले आहे.

शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली, तसेच रवीकांत तुपकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चा करीत मदतीचे आवाहन केले, त्यानंतर शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत शिंदे सरकारने रवीकांत तुपकर यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर रवीकांत तुपकरांनी आंदोलन मागे घेतले. या बैठकीनंतर शिंदे सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने दिलेला शब्द फिरकविला तर, पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा रवीकांत तुपकर यांनी दिला. तसेच, रवीकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला आहे. यासोबतच राज्यातून एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत(central government) चर्चेसाठी जाणार आहे.

शिंदे सरकारने बुधवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना(Farmers) मदत जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटींची मदत सरकारने जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर