spot_img
HomeUncategorizedMumbai : लम्पी चर्मरोग : नुकसानभरपाईपोटी राज्यातील 7 हजार 274 पशुपालकांच्या खात्यांवर...

Mumbai : लम्पी चर्मरोग : नुकसानभरपाईपोटी राज्यातील 7 हजार 274 पशुपालकांच्या खात्यांवर 18.49 कोटी रुपये जमा

प्रशांत बारसिंग
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे(lumpy skin disease) ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसानभरपाई म्हणून रु. १८.४९ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

सचिंद्र सिंह(Sachindra Singh) म्हणाले की, महाराष्ट्रातील लंपी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज रोजी 3 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. राज्यामध्ये दि. 21 नोव्हेंबर 2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3666 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 282595 बाधित पशुधनापैकी 205110 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19077 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.97 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव(Jalgaon), अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सुमारे 98.61% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सचिंद्र सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबविण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचारविषयक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर(livestock) उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

नुकत्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्मरोगाने बाधित नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम(campaign) स्वरूपात पूर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही सचिंद्र सिंह यांनी केले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर