spot_img
HomeUncategorizedMumbai : विद्यापीठाच्या परीक्षा भवनात इंटरनेटचा खेळखंडोबा!

Mumbai : विद्यापीठाच्या परीक्षा भवनात इंटरनेटचा खेळखंडोबा!

8 हजार विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम

मुकुंद लांडगे
मुंबई : गेल्या १० दिवसांपासून विद्यापीठाच्या परीक्षा भवनात इंटरनेटचा खेळखंडोबा झाला असून, त्यामुळे तब्बल ८ हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. त्यांनी दिलेल्या परीक्षांचे निकाल एकीकडे रखडले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) वतीने करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनामध्ये(examination hall) अभियांत्रिकीच्या जवळपास ८ हजार विद्यार्थ्यांनी रिव्होल्युशनसाठी एप्लिकेशन केले आहे. मात्र, रिव्होल्युशनचा फॉर्म भरल्यानंतर आता दोन महिने म्हणजेच ६० दिवस उलटून गेले आहेत, तरीही त्यांचे परीक्षेचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी, तसेच प्रवक्ते ॲड. अमोल मिटकरी यांनी आज येथे जाऊन माहिती घेतली. त्यानुसार, याठिकाणी गेल्या १० दिवसापासून परीक्षा भवनामध्ये नेट नाही हे कारण सांगण्यात आले. तर, या विद्यार्थ्यांची आता येत्या २३ नोव्हेंबरपासून पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे, अशी माहिती मातेले यांनी दिली.

दरम्यान, रिव्होल्युशनचे फॉर्म भरल्यानंतर जर विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसेल, तर त्याचा उपयोग काय?, असा सवाल करीत रिव्होल्युशनचे फॉर्म भरलेल्या तारखेपासून ३० दिवसांमध्ये त्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. तर, दुसरीकडे बरेच विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पास होऊन काही विद्यार्थ्यांना एका विषयात एटी-केटी लागलेली असून, केवळ एका मार्कासाठी अनेक विद्यार्थ्यांना एटीकेटी(AT-KT) लागलेली आहे, असेही संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती घेऊन ती परीक्षा भवनाचे नियंत्रक सागर कारंडे(Sagar Karande) यांच्या कानावर घातली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर