spot_img
Homecrime-mrMumbai : अनू कपूर यांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यास केली अटक

Mumbai : अनू कपूर यांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यास केली अटक

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : अभिनेते अनू कपूर(Anu Kapoor) यांचे बँक खात्याची केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीस बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष जगदीश पासवान(28 वर्ष) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी यांना एक फोन कॉल आला. समोरील व्यक्तीने एचएसबीसी बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून आपण आपल्या बँक खात्याची केवायसी(KYC) केली नाही, तर बँकेचे खाते बंद होईल, असे सांगून अनू कपूर यांना विश्वासात घेऊन त्यांचे बँक खाते क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर अनू कपूर यांच्या खात्यातील तब्बल चार लाख 36 हजार रुपये काढून त्याने फसवणूक केली. खात्यातून पैसे गेल्याची बाब लक्षात येताच अनू कपूर यांनी यासंबंधीची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात येऊन नोंदवली.

तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने(cyber team) प्राप्त माहितीच्या आधारे व आरोपीने ज्या खात्यामध्ये पैसे वळविले होते त्या खात्यांची केवायसीसाठी वापरण्यात आलेले डॉक्युमेंट तपासून ते खाते आशिष जगदीश पासवान याच्या नावे असल्याचे शोधले.

यानंतर खात्याशी संबंधित मोबाईल नंबर बंद असल्यामुळे मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाच्या(IMEI number) आधाराने आरोपीचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन तपासले असता, तो बिहार येथे असल्याचे आढळून आले. यानंतर सायबर पोलिसांचे एक पथक बिहारमध्ये जाऊन आरोपीला अटक करून घेऊन आले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर