Jalna : ‘रसना’ कंपनीचे अध्यक्ष आरीस खंबाट्टा यांचे निधन

0
172

Indiagroundreport वार्ताहर
जालना : ‘रसना'(‘Rasana’) कंपनीचे अध्यक्ष आरीस पिरोजशा खंबाट्टा यांचे निधन झाले आहे. रसना ग्रुपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरीस पिरोजशा खंबाट्टा हे रसना कंपनी बरोबरच अरिज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्टचेही अध्यक्ष होते. तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीसाठी त्यांनी अध्यक्षपदी कारभार पाहिला होता. एवढेच नाही, तर ते अहमदाबाद(Ahmedabad) पारसी पंचायतीमध्ये माजी अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीविषयी सांगताना म्हटले की, खंबाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतातील उद्योग, व्यापार आणि समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले आहे.