spot_img

Mira Road : आयुक्त यांच्या उपस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत
फेरीवाले व पत्रा शेडवर करण्यात आली कारवाई

अनधिकृतपणे फेरीवाल्यांना वीजपुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे
आयुक्त यांचे निर्देश

मीरा रोड़ : मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले, दुकानांच्या बाहेर
अनधिकृतपणे तयार केलेले पत्रा शेड या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून
आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी ‘वॉक विथ कमिशनर’ या
संकल्पनेतून भाईंदर स्टेशन पूर्व, बी.पी. रोड, मिरा रोड स्टेशन व शांती नगर परिसरात पाहणी दौरा केला.
मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत भाईंदर स्टेशन पूर्व, बी.पी. रोड, मिरा रोड स्टेशन व शांतीनगर
परिसरातील अनधिकृत फेरीवाले व दुकानाच्या बाहेरील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली.
15 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:00 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत आयुक्त
यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भाईंदर स्टेशन पूर्व, बी.पी. रोड, मिरा रोड स्टेशन व शांतीनगर परिसरातील
अनधिकृत फेरीवाले व दुकानाच्या बाहेरील अनधिकृत पत्रा शेडवर तोडक कारवाई करण्यात आली.

अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या, परवाना नसलेली स्टॉल्स, फुटपाथवर
अनधिकृतरित्या विक्री करणारे विक्रेता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्यतः जे दुकानदार
स्वतःच्या दुकानातून रस्त्यावरील फेरीवाल्यांना अनधिकृतपणे वीजपुरवठा करत होते त्या दुकानदारांवर
गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मा. आयुक्त यांनी दिले. तसेच दुकानांच्या बाहेर अनधिकृतरित्या तयार
करण्यात आलेले पत्रा शेड, बांबूने बांधण्यात आलेले शेड यांच्यावर तोडक कारवाई करून दुकानदारांचा माल
जप्त करण्यात आला. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत
मानोरकर, उपायुक्त (अतिक्रमण) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व.
आरोग्य) रवी पवार, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, प्रभाग अधिकारी, महानगरपालिका
अधिकारी, फेरीवाला पथक प्रमुख, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, मिरा भाईंदर वसई विरार शहर पोलीस
अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

New Delhi : केंद्र ने कहा- हाई कोर्ट एयर प्यूरीफायर पर जीएसटी घटाने का आदेश नहीं दे सकता

नई दिल्ली : (New Delhi) केंद्र सरकार (Central Government) ने कहा है कि उच्च न्यायालय एयर प्यूरीफायर पर जीएसटी घटाने का आदेश नहीं दे...

Explore our articles