Jalgaon : सत्‍तेचा वापर करीत दबावतंत्र; याला घाबरणार नाही : एकनाथ खडसे

0
142
Jalgaon : Coercive techniques using force; Will not be afraid of this: Eknath Khadse

Indiagroundreport वार्ताहर
जळगाव : (Jalgaon)
जिल्हा दूध संघात सध्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला, तरी आम्ही याला घाबरणार नाही आणि भीकही घालणार नाही, अशा शब्दांमध्ये आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी जोरदार टीका केली आहे.

जिल्हा दूध संघाचे एमडी स्वत: तक्रारदार असताना त्यांना अटक करण्यात आली. तर, निवडणुकीत आम्हीच विजय मिळविणार असल्याने हे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

दूध संघाच्‍या निवडणुकीसाठी(election) नियम बदलले गेले आहेत. राजकीय दबावाखाली हे नियम बदलले जात आहेत. सत्‍तेचा दुरूपयोग होत आहे. निवडणुकीत लढायचे असेल, तर ताकदीने लढा. दूध संघात गैरव्‍यवहार असेल, तर फॅारेन्सिक ऑडिट करा, याच्‍याशिवाय मोठे ऑडिट असू शकत नाही.

गर्दी असल्‍याने जितेंद्र आव्‍हाडांनी(Jitendra Aawhad) महिलेला बाजूला केले आहे. परंतु, असे गुन्‍हे दाखल होत असतील तर योग्‍य नाही. असे असले तर सर्वच गर्दीच्‍या ठिकाणी गुन्‍हे दाखल होतील. जितेंद्र आव्‍हाडांना त्रास द्यायचाय म्‍हणून सत्‍तेचा दुरूपयोग असून, सत्‍तेचा हा माज असल्‍याचे एकनाथ खडसे म्‍हणाले.