spot_img

Entertainment : मी पुस्तकी किडा आहे : मोहित डागा

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये अशोकची भूमिका साकारणारे मोहित डागा म्हणाले की, मी इतरत्र कोणत्याही गोष्टींपेक्षा पुस्तक वाचनाचा अधिक आनंद घेतला आहे. मी पुस्तकी किडा(bookworm) आहे. आरामदायी खुर्चीवर बसून उत्तम पुस्तक वाचण्यामधून मला खूप आनंद मिळतो. मी ते पुस्तक रोमांस, रहस्यमय, उच्च संकल्पित विज्ञान काल्पनिक कादंबरी असो किंवा जीवनाला कलाटणी देणारी संस्मरणीय कादंबरी असो याचा अधिक विचार करीत नाही. मला वाचन आवडते. माझ्या आवडत्या पुस्तकांची यादी न संपणारी आहे, पण माझ्या बालपणीचे आवडते पुस्तक आहे ‘अमर चित्रकथा’ आणि माझ्या मते, विशेषत: नवीन वाचकासाठी वाचनाप्रति आवड निर्माण करण्यासाठी ते उत्तम आहे. तुम्ही त्वरित वाचन पूर्ण करू शकता आणि पौराणिक कथांमधून मिळालेल्या शिकवणी व्यक्ती म्हणून तुमच्या जीवनात मूल्ये व संस्काराची भर करतात.

‘पुस्तकं'(‘Books’) हे जीवनातील सर्वात मोठा आनंद देतात. ते आपल्याला वास्तविकतेची जाणीव करून देतात आणि काल्पनिक कथांची भूरळ घालतात. पुस्तके लोकांच्या लिव्हिंग रूम्सचा भाग असण्यासोबत सर्वोत्तम सोबती आहेत. तसेच प्रवासातील उत्तम सोबती देखील आहेत. उत्तम पुस्तक वाचनामधून मिळणाऱ्या उत्साहाला कोणत्याच सीमा नाहीत, मग ते पुस्तक प्रत्यक्षातील असो किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असो. ‘वर्ल्ड बुक लव्हर्स डे'(‘World Book Lover’s Day’) निमित्त पुस्तक वाचन करण्याचे महत्त्व सांगत एण्ड टीव्ही कलाकार व पुस्तकी किडे पुस्तकांप्रति त्यांच्या आवडीबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मोहित डागा(अशोक, ‘दूसरी मॉं’), हिमानी शिवपुरी(कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाभीजी घर पर है’).

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी(Himani Shivpuri) म्हणाल्या की, मी खरी ग्रंथलेखक आहे. पुस्तके वाचल्याने मनाला शांती मिळते आणि माझ्याकडे पुस्तकांचा एक अद्भुत संग्रह आहे. तुम्हाला माझ्या बॅगेमध्ये नेहमीच पुस्तक पाहायला मिळेल. दररोज प्रवास करताना वाचन करणे ही सर्वोत्तम भावना आहे. मला लवकरच समजले की, पुस्तकांमध्ये आपली विचारसरणी सुधारण्याची क्षमता आहे. मी लहान असताना देशातील प्रत्येक घरामध्ये प्रेमचंद व सरत चंद्र कथा पाहिल्या. त्यांची कोणतीही पुस्तके निवडा, प्रत्येक कथा इतक्या लक्षवेधक आहेत की, त्यामुळे जीवनाप्रति तुमचा दृष्टिकोन निश्चितच बदलेल.

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले की, मला जीवनात लवकरच वाचनाची आवड जडली, ज्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते. आम्हा कुटुंबियांना वाचन करायला आणि आसपास पुस्तके असायला आवडते. माझे वडील नेहमी म्हणायचे की, पुस्तकाशिवाय खोली म्हणजे आत्माशिवाय शरीर. माझ्या बालपणी मी पुस्तकी किडा होतो. मी माझ्या आवडत्या लेखकांच्या विचारसरणीमध्ये इतका भारावून जायचो की, कधीच माझ्या पाठ्यपुस्तकांकडे फारसे लक्ष दिले नाही. मला नेहमी शरद जोशी, प्रेमचंद, हरिशचंद्र, विजय तेंडुलकर व मोहन राकेश यांची पुस्तके व नाटके वाचायला आवडायचे. मी हजारवेळा त्यांची पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचू शकतो. तसेच, अश्विन सांघी यांचे ‘चाणक्याचा मंत्र’ देखील मला खूप आवडते. या पुस्तकामधून दिग्गज चाणक्य यांच्या प्रसिद्ध रणनीती माहीत होतात. पालक म्हणून आपण आपल्या मुलांना वाचनाची आवड लावली पाहिजे आणि माझ्या वडिलांनी हीच गोष्ट केली. मी माझ्या मुलीसाठी घरी एक लहान ओपन लायब्ररी(open library) ठेवली आहे. पुस्तकांच्या प्रदर्शनामधून दीर्घकाळापर्यंत वाचनाची आवड जडू शकते. वर्ल्ड बुक लव्हर्स डे निमित्त मी सल्ला देतो की, सर्व वयोगटातील व्यक्तींनी प्रतितिमाही किमान एक पुस्तक वाचण्यास सुरूवात केली पाहिजे आणि त्यानंतर वाचनगती व आवड वाढविण्यासाठी पुस्तकांची संख्या वाढविली पाहिजे. पुस्तक वाचन हा छंद असण्यासोबत जीवनाचा मार्ग असू शकतो.

Explore our articles