
Indiagroundreport वार्ताहर
हैदराबाद : बाहुबली अभिनेत्री देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीच्या(Anushka Shetty) जन्मदिनानिमित्त तिच्या आगामी चित्रपटाची नूतन आणि अधिकृत झलक प्रदर्शित करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश बाबू करणार आहेत. यात अभिनेते नवीन पोलीशेट्टी देखील आहेत. अनुष्का शेट्टी यात ‘अन्विथा रावली शेट्टी’ ही भूमिका साकार करीत आहे.
‘मिर्ची’ आणि ‘भागमती’ नंतर अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा युव्ही क्रिएशन संस्थेसोबत काम करणार आहे.

अनुष्का शेट्टीला अगदी थोड्या काळातच विविध भाषांमध्ये आणि अग्रणी अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली. एका सामान्य कुटुंबातून समोर आलेल्या अनुष्का शेट्टी हिने गेल्या सोळा वर्षात चित्रपटात विविध भूमिका बजावत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. एस. एस. राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटानंतर प्रभाससह(Prabhas) अनुष्का शेट्टी हिच्या चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बाहुबली सिनेमाच्या माध्यमातून देवसेना म्हणून अभिनेत्री अनुष्का शेट्टी घरा-घरात पोहोचली. ‘बाहुबली’, ‘रुद्रमदेवी’, वेदम आणि ‘अरुंधती’ चित्रपटाने त्यांना वेगळी उंची प्रदान केली.