
Indiagroundreport वार्ताहर
पटना : (Patna) बिहारमध्ये रोहतास येथे 500 टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर आता या चोरट्यांनी भुयार खोदून रेल्वेचे अख्ख इंजिनच(entire engine) पळविल्याची घटना उघड झाली आहे. इतकेच नाही, तर या चोरांनी ते इंजिन विकले सुद्धा. त्यामुळे या अजब चोरीची घटना ऐकून पोलीसही चक्राविले आहेत.
मुझफ्फरपूर(Muzaffarpur) येथे भंगाराच्या दुकानात एका बॅगमध्ये इंजिनचे काही सुटे भाग सापडले, त्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली, त्यानंतर माहितीच्या आधारे मुझफ्फरपूर येथील प्रभात कॉलनीतील भंगाराच्या गोदामात जाऊन इंजिनच्या सुटे भाग भरून ठेवलेल्या 13 गोण्या जप्त केल्या.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक भुयार सापडला आहे. ज्यामधून हे चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट गोण्या भरून घेऊन जायचे. रेल्वे(Railway) अधिकाऱ्यांना तर त्याबाबतची काहीच माहिती नव्हती.
काही दिवसांपूर्वी पूर्णि या जिल्ह्यातही अशीच एक चोरीची घटना घडली होती. चोरांनी विंटेज मीटर गेज स्टीम इंजिन विकले होते. स्थानिक रेल्वे स्थानकात हे इंजिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर हे इंजिन चोरी गेल्याचे दिसून आले आहे. समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजिनियरकडून देण्यात आलेल्या बनावट पत्राच्या आधारे हे इंजिन विकण्यात आले.
तसेच, काही दिवसांपूर्वी बिहारच्या उत्तर पूर्वेकडील अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील पुलाचे काही भाग चोरांनी(thieves) गायब केले होते. त्यानंतर आता हा दुसरा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.