
Indiagroundreport वार्ताहर
भिवंडी : (Bhiwandi) भिवंडी(Bhiwandi) येथे कापूर आणि अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात घडली आहे. आज सकाळच्या साडे सहा वाजताच्या सुमारास कापूर आणि अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली.
दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी, कल्याण- डोंबिवली, ठाणे(Thane) महापालिकेचे एकूण ५ ते ६ बंब दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी ४ ते ५ तास लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
या भीषण आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे(smoke) लोट पसरले. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे, तर ही आग नेमकी कशी लागली याचे कारणही समजू शकलेले नाही.