spot_img

Amravati : … नाही तर महाविद्यालयाचे अनुदान होणार बंद

Indiagroundreport वार्ताहर
अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गाईडलाईननुसार, अनुदानित असो वा कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद अर्थात नॅक(NAAC) मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. तथापि, अमरावती जिल्ह्यात अनुदानित ४५ महाविद्यालये असून, ७३ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी विनाअनुदानित सहा, तर कायम विनाअनुदानित ६० महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेले नाही. अशा महाविद्यालयांना सहा महिन्यांत नॅक मूल्यांकन करावे लागेल, अन्यथा अनुदान बंद केले जाईल, असा इशारा उच्च व शिक्षण सहसंचालकांनी १० ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे दिला आहे.

विद्यापीठातून महाविद्यालयांना(colleges) मान्यता मिळविताना संबंधित संस्थेला पायाभूत सुविधा, विद्यार्थीहित जोपासणे, शैक्षणिक दर्जा, संगणक कक्ष, प्रशस्त वाचनालय, कॅन्टीन, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पटांगण, क्रीडांगण, हिरवळ, महिला सुरक्षा समिती या बाबींचा नॅकमध्ये समावेश आहे.

अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन दर्जा मिळविला नाही, तर येत्या सहा महिन्यांत संबंधित महाविद्यालयाची मान्यता रद्द करून टाळे लावण्यात येईल, असे उच्च व शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी आदेश पारित केले आहेत. या आदेशासंदर्भात सर्व महाविद्यालय तसेच संस्था अध्यक्ष, प्राचार्य, सचिवांना कळविले आहे. त्यामुळे नॅकसंदर्भात लगबग सुरु आहे.

अमरावती(Amravati) जिल्ह्यात एकूण ४५ अनुदानित महाविद्यालये आहेत, त्यापैकी सहा महाविद्यालयांनी अद्यापही नॅक मूल्यांकन केलेले नाही. पहिल्या टप्प्यात अनुदानित महाविद्यालयांना सक्ती करण्यात आली आहे. नोटीस बजावल्यापासून सहा महिन्यांची मुदत दिली आहे, असे डॉ. केशव तुपे(सहसंचालक उच्च व शिक्षण, अमरावती) यांनी म्हटले.

Explore our articles