
दीपक कैतके
मुंबई : दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘संविधान दिना’च्या(‘Constitution Day’) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्यावतीने गुरुवारी ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कूपरेज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मंत्रालयातील(Mantralaya) त्रिमूर्ती प्रांगणात सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य सचिव, तसेच मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
शासन स्तरावर ‘संविधान दिन’ साजरा व्हावा यासाठी पाठपुरावा करणारे निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे(E. Z. Khobragade) उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाला सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी केले आहे.