Mumbai : दागिने आणि मोबाईल असलेली हरवलेली थैली मालकास सुपूर्द

0
167
Mumbai: Lost bag containing jewelery and mobile handed over to owner

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
घाटकोपर पश्चिमेकडील(Ghatkopar West) रेल्वे स्थानक परिसरातील भारत केफे हॉटेलसमोर बेवारस पडलेली सोन्याचे दागिने, मोबाईल, तसेच रोकड असलेली थैली घाटकोपर पोलिसांनी मालकाला मिळवून दिली आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

याठिकाणी हॉटेलच्या समोर मागच्या आठवड्यात ही थैली पडली होती, मात्र ती कोणी नेण्याच्या आधीच पोलिसांना कोणीतरी याबाबत माहिती दिल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातील हवालदार सुनील गाढवे आणि चीकने हे येथे गेले. त्यांनी ती थैली(bag) ताब्यात घेऊन मालकाचा शोध सुरू केला. मात्र, त्यापूर्वी त्यात काय आहे हे तपासून पाहिले, तर त्यात १ एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र, एक साधा आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल, तसेच २१० रुपयांची रोकड असा ऐवज मिळून आला. त्यामुळे त्यांनी थैलीमालकाचा शोध घेत त्यातील मोबाईलवरून काही जणांना संपर्क केला. त्यावेळी त्यांना सुभाष सरगर यांची ती थैली असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून अखेर ती सरगर यांचा पुतण्या सनी सरगर यांच्याकडे सुपूर्द केली.