spot_img

Mumbai : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घाटकोपर येथे आंदोलन

Mumbai: Protest against Governor Bhagat Singh Koshyari in Ghatkopar

मुकुंद लांडगे
मुंबई : (MUMBAI)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अनुद्गार कढल्याच्या निषेधार्थ ईशान्य मुंबई शिवसेनेच्या(उध्दव बाळासाहेब ठाकरे)वतीने आज दुपारी घाटकोपर(Ghatkopar) येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करीत त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

घाटकोपर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगतच्या वेलकम हॉटेलसमोर हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना ईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भारतीय खोका पक्षाचा, ढोंगी हिंदुत्ववाद्यांचा धिक्कार’ अशा घोषणा दिल्या. तर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Governor Bhagatsinh Koshyari), खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा धिक्कारही यावेळी करण्यात आला. शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रमांक-८ च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपशाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, भा.वि.से पदाधिकारी, तसेच अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.

Explore our articles