Mumbai : विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरण : पोलिसांनी चालकाला केली अटक

0
188
Mumbai: Vinayak Mete accidental death case: Police arrest driver

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
शिवसंग्रामचे प्रमुख तथा माजी आमदार विनायक मेटे(Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आज, गुरुवारी विनायक मेटे यांच्या चालकास पोलिसांनी अटक केली आहे. काहीदिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विनायक मेटे यांचा अपघात झाला होता. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता. सीआयडीने विनायक मेटे यांच्या चालकाविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. एकनाथ कदम(Eknath Kadam) असे चालकाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचेही बोलले जात होते.

वेगाने गाडी चालवित असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती. त्यानंतर आज, गुरुवारी विनायक मेटे अपघाती मृत्यूप्रकरणी विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदमला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर चालकास आज, गुरुवारी खालापूर कोर्टात(Khalapur court) हजर केले.

विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईला येताना अपघाती निधन झाले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर(Mumbai-Pune Express way) पहाटे ५:३० वाजता भातान बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली होती. विनायक मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.

अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर विनायक मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती, यानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.