Mumbai : पर्यावरणपूरकता जपत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होणारा मुंबईतील गणेशोत्‍सव अभिमानास्पद : आश्विनी भिडे

0
167

श्रीगणेश गौरव पुरस्कार–२०२२ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

विविध गटांतील ३० पेक्षा अधिक पारितोषिकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहात वितरण

धीरज सिंग
मुंबई : आपल्या मुंबई महानगरीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव हा अतिशय उत्साहाने व शिस्तबद्धरित्या साजरा होतो. बृहन्मुंबई सारख्या लोकसंख्येची घनता अधिक असणा-या व दाटीवाटीने वसलेल्या महानगरात शिस्त आणि पर्यावरणपूरकता जपत मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक स्तरावर साजरा होणारा गणेशोत्सव हा निश्चितच अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी काढले. त्या आज बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्रीगणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

याप्रसंगी परिमंडळ-२ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ॲड. नरेश दहिबांवकर यांच्‍यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे या उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, गेल्या २ गणेशोत्सवांदरम्यान ‘कोव्हिड’च्या साथीमुळे आपण मर्यादित पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा केला. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना गणेशभक्तांनी व श्रीगणेश मंडळांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला व चांगले सहकार्य केले. तसेच, यंदा कोव्हिडची साथ नियंत्रणात आल्यानंतर केलेल्या आवाहनांना देखील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांप्रती आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमंडळ-२ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान बिरादार यांनी बृहन्मुंबईतील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये नमूद करतानाच श्रीगणेश गौरव स्पर्धा आयोजनामागील हेतू देखील सांगितला. श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे उभारण्यात येणा-या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, पर्यावरण जनजागृती संदेश आणि नागरी सेवा-सुविधांविषयक संदेश जनसामान्यांपर्यंत अधिकाधिक प्रभावीपणे पोहोचण्यास प्रोत्साहन मिळावे, या प्रमुख हेतुने ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे आवर्जून नमूद केले.

आज आयोजित पुरस्कार सोहळ्यादरम्यान बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ॲड. नरेश दहिबांवकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतादरम्यान दहिबांवकर यांनी श्रीगणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येणा-या नियोजनाचे व सेवा-सुविधांविषयक अंमलबजावणीचे कौतुक केले. त्याचबरोबर गेली ३३ वर्षे श्रीगणेश गौरव स्पर्धा सुयोग्यप्रकारे व नेटकेपणे आयोजित करणा-या महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाचेही त्यांनी विशेषत्वाने कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारितील संगीत कला अकादमीच्या चमूने वंदेमातरम्, स्वागतगीत आणि गणेशगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र काळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी केले.

आजच्या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे व उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याहस्‍ते सन्‍मानचिन्‍ह, प्रशस्‍त‍िपत्र, तुळशीचे रोप व धनादेश देऊन स्पर्धेतील विविध विजेत्‍यांना गौरविण्‍यात आले. याबाबतचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे-

प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)
पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३.

द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)
युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड(पश्चिम),
मुंबई – ९५.

तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)
स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३.

सर्वोत्कृष्ट मूर्ती (रु.२५,०००/-)
बालमित्र कला मंडळ, विजया हाऊस, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ८३.

सर्वोत्कृष्ट नेपथ्य (रु.२०,०००/-)
रायगड चौक सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, रामदूत हनुमानमंदिरा शेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ७७.

• दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)

१) नवतरुण मित्रमंडळ, गांवदेवी मंदीर, गांवदेवी नगर, कोकणी पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – ६८.

२) विकास मंडळ(साईविहार), साईविहार मार्ग, भांडुप(पश्चिम), मुंबई – ७८.

शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती – पारितोषिक (रु.२५,०००/-)
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजूरमार्ग, कांजूरगांव (पूर्व), मुंबई – ४२.

• प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके : (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
👇
१) श्रीहनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई – १७.

२) गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई – ३३.

•अवयवदान / आरोग्य जागृतीः पारितोषिक रु.१५,०००/-
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगांव, मुंबई – १०.

प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे

उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठीः
👇
१. बाळाशेठ मडुरकर(बी. एम.) मार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवराज भवन क्रमांक २ व प्राईम प्लाझाजवळ, बी. एम. मार्ग, प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड), मुंबई.

२. श्रीगणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई.

३. रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, काळाचौकी.

४. खारवा गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, गिरगांव.

नेपथ्यासाठी:
👇
१. साईनाथ मित्र मंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

२. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती, अंधेरी (पश्चिम), मुंबई.

३. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ, मुंबई.

४. सुभाष लेन गणेश साई सेवा मंडळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई.

प्रबोधनासाठी:

१. इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धारावी, मुंबई.

२. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई.

३. प्रतिक्षा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शीव – कोळीवाडा, मुंबई.

४. श्री श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर (पूर्व), मुंबई.

पर्यावरणविषयक जनजागृतीसाठीः
👇
१. शांतीनगर रहिवाशी संघ, मुलुंड (पश्चिम), मुंबई.

२. ओम श्री सिद्धीविनायक मित्रमंडळ, साकीनाका, मुंबई.

३. साईनाथ मित्रमंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

४. सार्वजनिक उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

सामाजिक कार्यासाठीः
👇
१. बाळ गोपाळ मित्रमंडळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई .

२. निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गिरगांव, मुंबई.

३) कन्नमवार नगर – १ उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

४) सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई.