
समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane) ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व दक्षता समितीच्या तालुकास्तरावरील बैठका नियमित घेण्यात याव्यात. अन्नधान्य नियतन, उचल व वाटप, शिधापत्रिकाधारकांना धान्य विहित वेळेत पोहचल्याबाबतची खात्री करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी(Collector) अशोक शिनगारे यांनी दिल्या.
जिल्हा दक्षता समितीची बैठक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ग्राहकांच्या समस्या व सेवा हमी अधिनियमाची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन पात्र लाभार्थी समावेश, शिधापत्रिकाधारकांना(ration card holders) गावातच धान्याचे वाटपाबाबतचा आढावा, त्रैमासिक नियतन साठविण्यासाठी गोदाम क्षमता वाढविण्याबाबत शासनाकडे विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.