
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune) शिक्रापूर पोलीस स्थानक(Shikrapur police station) हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी 6 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 7:30 ते 9:30 आणि सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज आदेश निर्गमित केला आहे.


