spot_img

Mumbai : सचिन तेंडुलकरने त्यासाठी प्रशांत दामलेला दिल्या शुभेच्छा

सोशल मीडियावर ‘त्या’ पोस्टची चर्चा

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने(Sachin Tendulkar) प्रशांत दामलेंसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन सचिनने प्रशांत दामले यांचे कौतुक केले आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12500 वा प्रयोग सादर करीत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या या विक्रमी कारकिर्दीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अभिनेते प्रशांत दामले(Prashant Damle) गेल्या अनेक दिवसापासून मराठी नाट्यसृष्टीत कार्यरत आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटक, मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये महत्वाचे पात्र साकारले होते. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील मोलाच्या कार्यामुळे सोशल मीडियावर ते सतत चर्चेत असतात. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या महत्वपूर्ण पात्रांमुळे ते आपल्या चाहत्यांमध्ये खास चर्चेत असतात. नाटकांव्यतिरिक्त त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटही केले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरही कमबॅक केले होते. सध्या रंगभूमीवर त्यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. नुकताच काल भारतीय रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. प्रशांत दामले नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. या पोस्ट्समधून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात.

अभिनेता प्रशांत दामले यांनी या नाटकाचा आज 12,501 वा प्रयोग सादर केला. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट'(Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाटकाचा विनामूल्य प्रयोग ठेवण्यात आला. या नाटकात मुख्य भूमिकेत प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर पुन्हा एकत्र काम करताना दिसत असून अतुल तोडणकर, प्रतिक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केले आहे.

Explore our articles