Sydney : बलात्कारप्रकरणी श्रीलंकेचा फलंदाज दानुष्का गुनाथिलकाला केली अटक

0
207

Indiagroundreport वार्ताहर
सिडनी :
(Sydney)श्रीलंकन क्रिकेट टीममधील आघाडीचा फलंदाज दानुष्का गुनाथिलका(Danushka Gunathilaka) याला बलात्कारप्रकरणी सिडनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय मायदेशी परतला. क्रिकेटपटूला अटक केल्यामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी(Australian police) दिलेल्या माहितीनुसार, गुणथिलकाला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गुणथिलकाच्या विरोधात २९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणथिलका आणि पीडित महिलेची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली.

गुणथिलकाला तीन आठवड्यांपूर्वी दुखापत झाली. त्याच्या जागी अशेन बंडारा(Ashen Bandara) याला संघात घेण्यात आले होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याला घरी पाठवण्याऐवजी संघासोबतच ठेवले होते.