
समर प्रताप सिंग
ठाणे : ठाण्याच्या होरायझन स्कूलच्या जवळ, हरदास नगर, ठाणे (प.) या ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेल्या तीन वाहनांना अचानक आग(fire) लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाने आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तिन्ही वाहने ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सोमवारी दीड वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थानाला मिळालेल्या माहितीच्या आधारे न्यू होरायझन स्कूलच्या जवळ, वसंत लॉन्सच्या समोर हरदास नगर, ठाणे (प.) येथे स्कूलच्या रोडला पार्क केलेल्या एकूण ०३ चारचाकी वाहनांना आग लागली. लागलेल्या आगीत सोमनाथ सकट यांचे क्वालीस चारचाकी(four-wheeler) वाहन, महिंद्रा झायलो, परवेश चौधरी यांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या वाहनांचा समावेश होता.