India Ground Report

Thane : ‘त्या’ रिक्षाचोरास केली अटक

Thane: 'That' rickshaw puller arrested

समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
15 सप्टेंबर रोजी एक व्यक्ती आपल्या मुलाचा शालेय गणवेश घेण्यासाठी आपली रिक्षा(rickshaw) घेऊन गेला होता. मात्र, शालेय गणवेश खरेदी सुरू असताना या अज्ञात गुन्हेगाराने रिक्षा चोरून नेली. ज्याची फिर्याद 16 सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अखेर जवळपास 2 महिन्यांनंतर नौपाडा पोलिसांनी आरोपीला रिक्षासह अटक केली आहे.

सुभाष ऊर्फ सुहास मोरे(19) असे अटक केलेल्या रिक्षा चोराचे नाव आहे. या आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने(The court) दिले आहेत. फिर्यादी रणजीत सिंगारे(45) हे वर्तकनगर, पवार नगर, म्हाडा कॉलनी येथे राहतात. 15 सप्टेंबर रोजी ते शाळेचा गणवेश घेण्यासाठी गेले असता, त्यांनी सेंट जॉन बॅप्टिस्ट हायस्कूलच्या मागे आपली रिक्षा उभी केली होती. गणवेश खरेदी केल्यानंतर सिंगारे हे त्यांच्या रिक्षेजवळ आले असता त्यांना रिक्षा तेथून गायब असल्याचे दिसले. त्यांनी १६ सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात(Naupada police station) रिक्षा चोरीची तक्रार दाखल केली. अखेर ५५ दिवसांनंतर या रिक्षा चोराला वागळे इस्टेट येथून अटक करण्यात आली आहे

Exit mobile version