India Ground Report

Solapur : शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला महापालिका आयुक्तपदाचा पदभार

Solapur: Sheetal Teli-Ugle took over as Municipal Commissioner

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : (Solapur)
आयएएस शीतल तेली-उगले(Sheetal Teli-Ugle) यांनी आज सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. यासोबतच त्या सोलापूर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या आहेत. आजवर त्यांनी पुणे, नागपूर आणि रायगड येथे विविध पदांवर सेवा बजाविली आहे.

आज सोलापूर महापालिकेच्या(Solapur Municipal Corporation) नव्या आयुक्त शीतल तेली-उगले यांचे महानगरपालिकेत आगमन झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शीतल तेली-उगले या मूळच्या अहमदनगर जिल्ह्याच्या आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यात सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये झाले. त्यांचे पती डॉ. बसवराज तेली हे आयपीएस अधिकारी असून, ते सध्या सांगली(Sangli) येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.

Exit mobile version