India Ground Report

Solapur : मनपाच्या इंग्रजी माध्यमात आता मक्तेदारांमार्फत शिक्षक भरती

9 नोव्हेंबरपासून अमलबजावणी

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : मराठी माध्यमांच्या महापालिका शाळांत पटसंख्या घसरत आहे. इंग्रजी माध्यमात पटसंख्या ५० वरून ७५० पर्यंत गेली आहे. महापालिका शिक्षण मंडळ आता कंत्राटी शिक्षक भरती करण्याऐवजी मक्तेदारामार्फत शिक्षक घेणार आहेत. याबाबत महापालिकेने टेंडर काढले आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहे. या दिवसापासून इंग्रजी माध्यम शाळांत मक्तेदारामार्फत शिक्षक येतील. टेंडर(tender) उघडण्यात येणार असल्याचे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी जावीर शेख यांनी सांगितले.

महापालिकेने(Municipal Corporation) कॅम्प शाळा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. माजी आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी ९ शिक्षकांची मुलाखत घेऊन भरती केली. त्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्यात येत होती. त्यांचे सहा महिन्याचे करार संपल्याने कंत्राटी पद्धत बंद करण्यात येणार आहे. मक्तेदारामार्फत ९ शिक्षक घेण्यात येणार आहे. यासाठी चार मक्तेदार इच्छुक आहेत. पालिकेत मक्तेदारांकडून शिक्षक घेण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.

Exit mobile version