India Ground Report

Sangli : मिरज परिसरात पावसाची हजेरी!

Indiagroundreport वार्ताहर
सांगली : दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी मिरज(Miraj) परिसरात पावसाने(rain) हजेरी लावली. पाऊस तुषार स्वरुपात पडला असला, तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे.

गेले दोन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी तर दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. जिल्ह्याचे तापमान किमान २२, तर कमाल ३२ सेल्सिअस आहे. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाऊस तुषार स्वरुपात झाला. यामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडाच पाणी साचून दावण्याचा धोका वाढला आहे. तर, हरभऱ्यावर(gram) घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version