India Ground Report

Pune : कुठे उभारला जाणार 300 किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्प?

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune)
पुणे स्टेशन येथील शिंदे वाहनतळ येथे ३०० किलोवॉट सौरऊर्जा प्रकल्प(solar power project) उभारला जाणार आहे. पुणे महापालिकेतर्फे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेतले जात असताना आता त्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीजेतून ई-बस, ई-कार आणि दुचाकी चार्ज केल्या जातील. या ठिकाणी दिवसभरात साधारणपणे १२ बस, सहा कार आणि १० दुचाकी चार्ज होतील.

शहरात सार्वजनिक व खासगी वाहनांची(private vehicles) संख्या ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात हवा व ध्वनी प्रदूषण होत आहे. हे टाळण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यातून डिझेल बस काढून टाकल्या आहेत. सध्या केवळ सीएनजी आणि ई-बसच(E-buses) ताफ्यात आहेत. तसेच, नागरिकांनी ई-वाहनांचा वापर वाढवावा, यासाठी बांधकाम नियमावलीत बदल करून खास चार्जिंग स्टेशन(charging stations) बांधणे बंधनकारक केले आहे. तसेच ई-दुचाकी भाड्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत पुणेकरांना ही सेवा मिळणार आहे.

Exit mobile version