India Ground Report

Pune : पीएमपी चालकास मारहाण

Pune: PMP driver beaten up

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune)
पुण्यात पीएमपीएमएलच्या बसचालकाला दुचाकी चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात(Pune station area) ही घटना घडली आहे. रस्त्यावरून जाताना दुचाकीचालक तरुण आणि पीएमपी चालक-वाहकांत जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

तरुणांनी चालकाला चक्क चप्पलेने मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सलग तिसर्‍या दिवशी असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. रविवारी स्वारगेट डेपोची बस सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. तेथे दुचाकीवरून तरुण जात होते. ते बससमोर आडवे आले, त्यामुळे चालकाने त्यांना हटकले. दोघांनीही एकमेकांच्या चुका सांगत बाचाबाची केली. तरुणांनी थेट चालकाची कॉलर पकडून चप्पलांनी(slippers) हाणामारी सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका पीएमपी चालक आणि दुचाकी चालकामध्ये(two-wheeler driver) वाद झाला. पीएमपी चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती असून, त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चालक, कंडक्टर आणि दुचाकीवरील व्यक्ती यांच्यामध्ये हाणामारी झाली. रविवारी ही घटना घडली असून, या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Exit mobile version