
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi) परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन 7 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील(Brazil) दौऱ्यावर आहेत. ही त्यांची पहिलीच ब्राझील भेट असेल. अधिकृत भेट भारत आणि ब्राझीलमधील उच्चस्तरीय देवाणघेवाणीचा हा एक भाग आहे.
यादरम्यान, व्ही. मुरलीधरन 8 नोव्हेंबर रोजी ब्राझीलच्या संसदेत(काँग्रेसो नॅशिओनल) आयोजित करण्यात येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या समारंभाला उपस्थित राहतील. ते दोन्ही सभागृहातील ब्राझिलियन संसद सदस्य, डिप्लोमॅटिक कॉर्प्स आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, ब्राझील सरकार आणि फ्रेंड्स ऑफ इंडियाचे प्रतिनिधी-मान्यवरांना संबोधित करतील. या दौऱ्यात राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींची भेट घेतील आणि ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयात संवाद साधतील. ते साओ पाउलो(Sao Paulo) येथे भारतीय समुदायालाही भेटतील आणि काँग्रेस आणि सिनेटचे सदस्य, मुत्सद्दी, ब्राझील सरकारचे सदस्य आणि भारतीय समुदायासह(Indian community) ब्राझील येथील समारंभात सहभागी होतील.