India Ground Report

New Delhi : आफताबच्या नार्को टेस्टला कोर्टाने दिली परवानगी

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : आफताब याच्या नार्को टेस्टला(narco test) कोर्टाने परवानगी दिली आहे, त्यामुळे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. श्रद्धा वालकर(Shraddha Walker) हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

आता आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होतील, अशी शक्यता आहे. आफताबची कोठडी संपल्यानंतर त्याला आज, गुरुवारी पुन्हा साकेत कोर्टात(Saket court) हजर करण्यात आले. त्याला कोर्टाने पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तसेच यावेळी आफताबची नार्को चाचणी करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

Exit mobile version