India Ground Report

Nashik : वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

Indiagroundreport वार्ताहर
नाशिक : शहरातील गंगापूर रोड(Gangapur Road) परिसरात असलेल्या नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. गौरव बोरसे(२१) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात(hostel) गौरव राहत होता. वाणिज्य तृतीय वर्ष शाखेचा तो विद्यार्थी होता. मंगळवारी सकाळी त्याच्या शेजारच्या खोलीतील मित्र इस्त्री मागण्यासाठी गौरवच्या खोलीकडे गेला असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. गौरवच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचे पालक सटाणा येथील रहिवासी असून, तो सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत होता.

Exit mobile version