India Ground Report

Mumbai : कोठे केले राज्यपालांविरोधात आंदोलन?

दीपक पवार
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना केंद्र सरकार परत बोलवत नाही, तोवर मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलन सुरुच राहील, असा इशारा रमाबाई आंबेडकर नगर(Ramabai Ambedkar Nagar) येथील आंदोलकांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj), राष्ट्रपिता जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले व महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत असल्याने आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा निषेध करीत आहोत. भगतसिंह कोश्यारी हे चूकत नसून जाणूनबुजून महाराष्ट्राचा व महामानवांचा अपमान करीत आहेत. त्यामागे त्यांची रास्वसंघाची जडण-घडण कारणीभूत असून ब्राम्हणी छावणीकडून बहुजन महानायकांना बदनाम करण्याची परंपराच रास्वसंघाची आहे, म्हणून आम्ही घाटकोपर(Ghatkopar) येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केले, अशी माहिती ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅकचे किशोर कर्डक यांनी दिली.

भगतसिंह कोश्यारींना(BhagatSingh Koshyari) केंद्र सरकार परत बोलवत नाही, तोवर मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलन सुरुच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक द्वारा आयोजित निदर्शनात लोकशाही युवा संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Exit mobile version