
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे(Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. रात्री उशिरा एक वाजता विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथील राहत्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुनील शेंडे मागील काही दिवसांपासून आजारी होते. रात्री उशिरा त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती सुनील शेंडे, दोन मुलं ऋषिकेश शेंडे आणि ओमकार शेंडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुनील शेंडे यांची अंत्ययात्रा आज दुपारी एक वाजता विलेपार्ले पूर्वेकडील(Vileparle East) हनुमान रोड येथील राहत्या घरातून निघाणार. पारशी वाडा हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली.
सुनील शेंडे हे रंगभूमी(theater) आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते होते. दोन दशकांच्या कालावधीत त्यांनी विविध बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या सोबतच अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय, त्यांनी विविध नाटकांमध्ये देखील काम केले होते.
त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटके केली आहेत. ‘गांधी’ चित्रपटाच्या माध्यमातूम त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी एका डाकूची भूमिका साकारली होती. जमीन(2008), यशवंत(1997), आई(1995), दौड : फन ऑन रन (1997), कृष्णा अवतार (1993), वास्तव (1999), सरफरोश(1999), बॉम्बे बॉईज (1998), जिद्दी (१९९७), गुनाह(2002), रोझबुश(2008) आणि नायदान(2000) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ते ‘पहला प्यार’ या टीव्ही मालिकेचा भाग होते. त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. ते एक अष्टपैलू अभिनेते होते. त्यांनी राजकारणी, पोलीस अधिकारी, डाकू, शास्त्रज्ञ आणि अगदी दयाळू वडील अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.