India Ground Report

Mumbai : सेंट्रल रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता म्हणून सुनील कुमार यांनी स्वीकारला पदभार

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सुनील कुमार(Sunil Kumar) यांनी दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेंट्रल रेल्वेच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंतापदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याआधी ते पूर्व मध्य रेल्वेमध्ये मुख्य यांत्रिक अभियंता(डिझेल आणि आपत्ती व्यवस्थापन) म्हणून कार्यरत होते. ते संघ लोकसेवा आयोगाच्या(UPSC) परीक्षेद्वारे निवडलेले स्पेशल क्लास रेल्वे ॲप्रेंटींस(SCRA) १९८४ बॅचचे IRSME अधिकारी आहेत आणि १९८५ मध्ये जमालपूरमध्ये रुजू झाले होते.

सुनील कुमार यांनी मुख्य यांत्रिक अभियंता(डिझेल लोकोमोटिव्ह फॅक्टरी – DLF), वर्कशॉप प्रोजेक्ट्स ऑर्गनायझेशन(Patna), मुख्य यांत्रिक अभियंता, पूर्व मध्य रेल्वे, मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता (मालवाहतूक), मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता (Coaching), पूर्व मध्य रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक(Mumbai Central), पश्चिम रेल्वे, तसेच पूर्व मध्य रेल्वेमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक(Danapur) म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे पोर्टफोलिओ हाताळले आहेत.

सुनील कुमार यांनी ELAS/बेल्जियम येथे लेझर कटिंग मशीनचे ॲप्लिकेशन आणि देखभाल, INSEAD, सिंगापूर आणि ICLIF, मलेशिया येथे ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम (AMP) कोर्स, ISB, हैदराबाद येथे भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांसाठी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट वर्कशॉप आणि जुलै २०१९ मध्ये मिलान, इटली(Italy) येथे ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक वर्कशॉप प्रोग्रामचे प्रशिक्षण घेतले आहे.

सुनील कुमार यांना एप्रिल २००६ मध्ये रेल्वे मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार(MR पुरस्कार), एप्रिल २००५ मध्ये पूर्व मध्य रेल्वेचा महाव्यवस्थापक पुरस्कार आणि एप्रिल २००१ मध्ये महाव्यवस्थापक, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स(CLW) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version