India Ground Report

Mumbai : राज ठाकरे 8 दिवसांच्या कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करीत ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.

मनसेने(MNS) आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, २९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला मंगळवारी(२९ नोव्हेंबर) सुरुवात होईल. ते सर्वात आधी मुंबईहून कोल्हापूरला(Kolhapur) रवाना होतील. त्यानंतर ते तेथून सावंतवाडीला जातील. २९ नोव्हेंबरला त्यांचा मुक्काम कुडाळ(Kudal) येथे असणार आहे. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दापोलीत संपणार आहे.

Exit mobile version